इंडिया-भारत नावावरील वादावर पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘…तसं इंडियाचं नाव भारत होऊ शकतं’
VIDEO | भाजप नेत्या पंकजा मुंडे सध्या शिवशक्ती परिक्रमा यात्रेवर असताना त्यांनी इंडिया-भारत नावावरील वादावर केलं भाष्य, म्हणाल्या...'बॉम्बेच मुंबई होऊ शकते, तसं इंडिया भारत ही एक चर्चा असून त्यावर निर्णय होणार?'
पुणे, ६ सप्टेंबर २०२३ | भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा सध्या राज्यभर शिवशक्ती परिक्रमा यात्रेचा दौरा सुरू आहे. पंकडा मुंडे यांनी ठिकठिकाणी चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. पंकजा मुंडे या आज पुण्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी सध्या देशात सुरू असलेल्या भारत आणि इंडिया या नावाच्या वादावरून भाष्य केले आहे. देशातील विरोधकांच्या आघाडीने इंडिया हे नाव दिल्यानं सत्ताधारी केंद्र सरकारकडून सर्व ठिकाणी भारत करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्यावरून अनेक आरोप-प्रत्यारोप पाहण्यास मिळत आहे. यावर पकंजा मुंडे म्हणाल्या, ‘तुम्ही इंडियामध्ये राहतात की भारतात? आपलं नाव भारत आहे आणि इंडिया आहे. बॉम्बेचं जसं मुंबई होऊ शकतं, तर इंडिया भारती ही एक चर्चा असून त्यावर काही तरी निर्णय होईल. आपण दोन्हीमध्ये राहत नसून त्या काळात कॉलनियन लोकांनी हे नाव दिलं आहे. ‘