Pankaja Munde | पंकजा मुंडेंना दुसऱ्यांदा कोरोना लागण-TV9

Pankaja Munde | पंकजा मुंडेंना दुसऱ्यांदा कोरोना लागण-TV9

| Updated on: Jan 01, 2022 | 9:20 PM

आता भाजप नेते आणि राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. पंकजा मुंडे या दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आल्या आहेत. दरम्यान, त्यांची प्रकृती चांगली आहे. त्या सध्या मुंबईतील निवासस्थानी क्वारंटाईन आहेत.

मुंबई : राज्यात कोरोनाचा फैलाव (Corona Outbreak) पुन्हा एकदा वेगानं सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. त्यातच नेतेमंडळीही मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. आता भाजप नेते आणि राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. पंकजा मुंडे या दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आल्या आहेत. दरम्यान, त्यांची प्रकृती चांगली आहे. त्या सध्या मुंबईतील निवासस्थानी क्वारंटाईन आहेत. त्यामुळे काळजीचं कारण नसल्याचं मुंडे यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, चार दिवसांपूर्वीच पंकजा मुंडे या परभणीच्या जिंतूर तालुक्यातील धमधम इथं एका कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. भगवानबाबा यांच्या मंदिराचा कलशारोहणासाठी त्या हेलिकॉप्टरने धमधममध्ये पोहोचल्या होत्या. या कार्यक्रमात भाषण केल्यानंतर त्यांनी जोरात भूक लागल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच आपण कुठल्या बंद खोलीत जेवणार नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर उपस्थित लोकांसोबतच त्यांना स्टेजवर जेवण वाढण्यात आलं होतं. त्यानंतर चार दिवसांनी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं आता चिंता वाढली आहे.

Published on: Jan 01, 2022 09:20 PM