Beed | ...जेव्हा धनंजय मुंडे पंकजाताईंच्या तब्येतीची चौकशी करतात - धनंजय मुंडे

Beed | …जेव्हा धनंजय मुंडे पंकजाताईंच्या तब्येतीची चौकशी करतात – धनंजय मुंडे

| Updated on: Jan 02, 2022 | 11:23 PM

पंकजा मुंडे यांना आपण मेसेज केला आहे. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तेव्हा त्यांनी तब्येत चांगली असल्याचं सांगितलं. मात्र, त्यांना दुसऱ्यांदा कोरोना झाला आहे. पोस्ट कोव्हिड इफेक्ट घातक ठरू शकतात. काळजी घेणं फार गरजेचं आहे. नंतरच्या काळात फार त्रास होतो. मी फोन तर नाही करु शकलो, पण काळजी घेतली पाहिजे, हे नक्कीच मी पंकजाताईंना सांगितलं, असं धनंजय मुंडे म्हणाले.

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नेत्यांच्या मुलांची लग्न आणि हिवाळी अधिवेशनानंतर राज्यातील विविध पक्षांचे नेते आणि मंत्री कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनाही दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. त्या सध्या मुंबईतील निवासस्थानीच क्वारंटाईन आहेत. तशी माहिती पंकजा यांनी स्वत: ट्विटरद्वारे दिली आहे. पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याचं समजल्यानंतर त्यांचे बंधू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे, तशी माहिती स्वत: धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.