Pankaja Munde : पंकजा मुंडे भावी मुख्यमंत्री? दसरा मेळाव्यापूर्वीच बीडच्या सावरगावमध्ये कार्यकर्त्यांची बॅनरबाजी

Pankaja Munde : पंकजा मुंडे भावी मुख्यमंत्री? दसरा मेळाव्यापूर्वीच बीडच्या सावरगावमध्ये कार्यकर्त्यांची बॅनरबाजी

| Updated on: Oct 24, 2023 | 12:50 PM

VIDEO | भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा आज दसरा मेळावा आहे. या मेळाव्याचं यंदाचं हे सातवं वर्ष आहे. दसरा मेळाव्याच्या ठिकाणी पंकजा मुंडे यांचे बॅनर झळकले आहेत. आमच्या CM तुम्हीच... अशी बॅनरबाजी कार्यकर्त्यांकडून बीडमध्ये करण्यात आली आहे. या बॅनरची सध्या रंगलीय चर्चा

बीड, २४ ऑक्टोबर २०२३ | भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा आज दसरा मेळावा आहे. बीड येथील सावरगाव घाट येथील भगवान भक्ती गडावर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पंकजा मुंडे यांच्या मेळाव्याचं यंदाचं हे सातवं वर्ष आहे. मेळाव्याला मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभमीवर व्यवस्था करण्यात आली आहे. पंकजा मुंडे या दसरा मेळाव्यात कोणत्या मुद्द्यावर बोलणार, नेमकं काय भाष्य करणार, याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहेत. असे असतानाच दसरा मेळाव्याच्या ठिकाणी पंकजा मुंडे यांचे बॅनर झळकले आहेत. या लावण्यात आलेल्या बॅनरमुळे पुन्हा चर्चा रंगली आहे. आमच्या CM तुम्हीच अशी बॅनरबाजी बीडमध्ये करण्यात आली आहे. तर राजकीय वर्तुळात सध्या या बॅनरची चांगलीच चर्चा रंगली आहे.

Published on: Oct 24, 2023 12:50 PM