VIDEO : क्रेनमधून 251 किलोंचा हार, JCB मधून 150 किलो फुलांची उधळण, पंकजा मुंडेंचं जंगी स्वागत
भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) आज बीड (Beed) दौऱ्यावर आहेत. एका खासगी कार्यक्रमाचे उद्घाटन पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) आज बीड (Beed) दौऱ्यावर आहेत. एका खासगी कार्यक्रमाचे उद्घाटन पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांसह नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. पंकजा मुंडे यांच्यावर क्रेन आणि जेसीबीतून पुष्पवर्षाव करण्यात आला. क्रेनच्या सहाय्याने तब्बल 251 किलोचा पुष्पहार त्यांना घालण्यात आला. तर 150 किलो फुले उधळण्यात आली. पंकजा मुंडे आणि गर्दी हे बीड जिल्ह्याचे समीकरण आहे. आज पंकजा मुंडेंची क्रेज पुन्हा एकदा पहावयास मिळाली.
Latest Videos