Pankaja Munde : पंकजा मुंडे यांनी दसऱ्यालाच फुंकले रणशिंग; म्हणाल्या, 2024 मध्ये आता पडणार नाही तर...

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांनी दसऱ्यालाच फुंकले रणशिंग; म्हणाल्या, 2024 मध्ये आता पडणार नाही तर…

| Updated on: Oct 25, 2023 | 10:28 AM

tv9 Marathi Special Report | परळी मतदारसंघातून कोण लढणार? सावरगावात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये २०२४ साठी मैदानात असेलच पण कुणाच्या मतदारसंघातून मी लढणार नाही, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी आपले इरादे स्पष्ट केले आहेत.

मुंबई, २५ ऑक्टोबर २०२३ | बीडमध्ये सावरगावात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये अप्रत्यक्षपणे पंकजा मुंडे यांनी परळी मतदार संघावर दावा केलाय. २०२४ साठी मैदानात असेलच पण कुणाच्या मतदारसंघातून मी लढणार नाही, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी आपले इरादे स्पष्ट केलेत. यावरून पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना इशारा दिलाय का? असा सवाल उपस्थित केला जातोय. दसरा मेळाव्यातून पंकजा मुंडे यांनी भाजपच्या नेतृत्वाला अप्रत्यक्षपणे ठणकावून सांगितले. दुसऱ्याची सीट हडपून लढणार नाही. किंवा खासदार प्रीतम मुंडे यांच्या जागी लढणार नाही हे त्यांनी स्पष्ट केले. २०१९ च्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना त्यांचे भाऊ धनंजय मुंडे यांनी पराभूत केले. आता पडणार नाही तर पाडणार असं म्हणत पंकजा मुंडे यांनी दसऱ्यालाच रणशिंग फुंकले. मात्र ज्या धनंजय मुंडे यांनी त्यांना पराभूत केले तेच आता अजित पवार यांच्या गटासह भाजपसोबत सत्तेत आहेत. त्यामुळे परळीतून कोण लढणार?

Published on: Oct 25, 2023 10:28 AM