कसब्यातील पराभवानंतर पंकजा मुंडे म्हणाल्या, 'लक्ष्मण जगताप यांना ही खरी आदरांजली'

कसब्यातील पराभवानंतर पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘लक्ष्मण जगताप यांना ही खरी आदरांजली’

| Updated on: Mar 02, 2023 | 10:33 PM

VIDEO | कसबा पोटनिवडणुकीतील झालेल्या पराभवानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

बीड : पुण्याच्या कसबा पोटनिवडणुकीचा निकाल लागला असून काँग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांनी विजय मिळवला आहे. 28 वर्षे भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदारसंघात सत्तांतर झालं आहे. रविंद्र धंगेकर यांना एकूण 73 हजार 194 इतकी मते मिळाली असून त्यांनी 11 हजार 40 मतांनी विजय मिळवला आहे. गिरीश बापट यांचे नेहमीच वर्चस्व असलेल्या मतदार संघात भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना पराभाव स्वीकारावा लागला आहे. यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. चिंचवडमध्ये भाजपाच्या अश्विनी जगताप यांनी विजय मिळवला आहे. याबद्दल पंकजा मुंडे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. लक्ष्मण जगताप यांना ही खरी आदरांजली आहे. विजयाचं जसं कौतुक केलं जातं, तसा पराभव देखील स्विकारला पाहिजे. कसब्यातील आमचा झालेला पराभव हा आम्ही स्विकारतोय, हा पराभव का झाला? याचा भाजप आणि पक्षश्रेष्ठी आत्मचिंतन करणार असल्याचे पकंजा मुंडे यांनी यावेळी म्हटले आहे.