Pankaja Munde : ‘माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना…’, सुरेश धसांना पंकजा मुंडे यांचं खोचक उत्तर
पंकजा मुंडे यांनी माध्यमांसमोर येऊन बीड हत्या प्रकरणामध्ये लवकरात लवकर कारवाई व्हावी असं बोलायला हवं होतं असंही सुरेश धस यांनी म्हंटलंय. दरम्यान, सुरेश धसांच्या या वक्तव्यावर पंकजा मुंडे यांनी भाष्य केले आहे.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच सुरेश धस हे सातत्याने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. तर पंकजा मुंडे यांनी माध्यमांसमोर येऊन बीड हत्या प्रकरणामध्ये लवकरात लवकर कारवाई व्हावी असं बोलायला हवं होतं असंही सुरेश धस यांनी म्हंटलंय. दरम्यान, सुरेश धसांच्या या वक्तव्यावर पंकजा मुंडे यांनी भाष्य केले आहे. माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना उत्तर देऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांच्यावरच्या प्रश्नावर दिली आहे. तसेच बीड हत्या प्रकरणामध्ये एसआयटी लावण्यासंदर्भात पहिलं पत्र मुख्यमंत्र्यांना मीच दिलं होतं, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली. पुढे ते असेही म्हणाल्या, ‘माझी लेव्हल छोटी आहे. जी माझी लेव्हल आहे त्या लेव्हलच्या विषयांना हाताळते. फार काही कोणा माझ्यापेक्षा मोठ्या अभ्यास असणाऱ्या लोकांच्या विषयांवर मी काही उत्तर देऊ शकत नाहीच. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांना जे पत्र लिहिलं एसआयटी लावायचं ते मी लिहिलं मी ते तुम्हाला कॉपी देऊ शकते. त्याचबरोबर मी जिथे जिथे आवश्यक आहे तिथे तिथे व्यक्त झाले एसआयटी लावावी अशी मागणी केली. प्रत्येक वेळी नागपूरमध्ये मी मिडियाला त्या संदर्भामधलं माझं मत स्पष्ट सांगितलं असल्याचेही त्या म्हणाल्या.