‘सरकारच्या तोंडावर पैसे फेकून मारू’, पंकजा मुंडे यांच्या मदतीसाठी समर्थक सरसावले
tv9 marathi Special Report | भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला जीएसटी विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. यानंतर पंकजा मुंडे यांनी त्या स्वतः आर्थिक संकटात असल्याची प्रतिक्रिया दिली तर आता समर्थकांकडून लोकवर्गणीची तयारी सुरू झाली आहे.
मुंबई, २ ऑक्टोबर २०२३ | भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला जीएसटी विभागाकडून नोटीस आली आणि त्यावरून अनेक दावे-प्रतिदावेही सुरू झाले आहे. मात्र असे असले तरी पंकजा मुंडे यांचे राज्यभरातील समर्थक एकवटले आहे. गोपीनाथ मुंडे यांनी उभारलेल्या कारखान्यासाठी लोकवर्गणीची तयारी सुरू करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र हाच कारखाना सध्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. या आर्थिक संकटातून गोपीनाथ मुंडे यांनी उभारलेला कारखाना वाचावा म्हणून गोपीनाथ मुंडे यांना मदत करण्यासाठी त्यांचे समर्थक पुढे सरसावले आहे. इतकेच नाही तर सोशल मिडीयावर तसे आवाहनही करण्यात आले आहे. यासह आष्टी गावातील कार्यकर्त्यांनी एक बैठक घेतली असून त्यांनी आम्ही पैसे गोळा करू आणि सरकारच्या तोंडावर मारू असेच थेट म्हटले आहे. साखर कारखान्याला नोटीस मिळाल्यानंतर पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया बरंच काही सांगणारी होती. बघा काय म्हणाल्या पंकजा मुंडे?