पंकजा मुंडे कार्यकर्त्यांना संबोधित करत होत्या अन् तितक्यात 'कमळ' पडलं, नेमकं काय घडलं?

पंकजा मुंडे कार्यकर्त्यांना संबोधित करत होत्या अन् तितक्यात ‘कमळ’ पडलं, नेमकं काय घडलं?

| Updated on: Mar 20, 2023 | 3:08 PM

VIDEO | भाजप पक्षाच्या एका कार्यक्रमात पंकजा मुंडे कार्यकर्त्यांना संबोधित करत होत्या, त्यावेळी नेमकं काय घडलं?, त्या प्रसंगाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर होतोय व्हायरल

बीड : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे बीड मध्ये एका पक्षाच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करत होत्या. यावेळी एक वेगळाच प्रसंग घडल्याचे पाहायला मिळाले. पंकजा मुंडे कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना अचानकपणे भाजपचं चिन्ह असलेलं कमळ हे खाली कोसळलं. पंकजा मुंडे बोलत असताना घडलेल्या या प्रसंगाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होते, नुसतीच चर्चा नाही तर या वेळचा प्रसंग आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. बीड जिल्ह्यात भाजपच्या बीड जिल्हा कार्यकारिणीची बैठक आणि बूथ सशक्तीकरण प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पंकजा मुंडे भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना त्यांच्या पाठीमागे लावण्यात आलेलं कमळाचे चिन्ह म्हणजेच भाजपची निशाणी खाली पडली. यामुळे एकच चर्चा सुरू झाली. दरम्यान पंकजा मुंडे यांनी केलेल्या भाषणात ऐवजी कमळ खाली पडल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

Published on: Mar 20, 2023 03:08 PM