‘जरांगे पाटील हा शरद पवारांचं कातडं घातलेला माणूस अन् EWS आरक्षणाचा खरा मारेकरी’, भाजपच्या नेत्याचं टीकास्त्र
'मनोज जरांगे हा खरा EWS आरक्षणाचा मारेकरी आहे. पहिली EWS संबंधात घेतलेली भुमिका आणि आता त्यांची असलेली मागणी यावरुन त्यांचे बदलते रंग दिसताय. मनोज जरांगे यांना वैफल्य आलं आहे. मराठ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलन उभं राहिलं लोकप्रियता मिळवली. पण आता आरक्षण राहिलं बाजूला आणि ते राजकीय नौटंकी करत आहेत. आता मराठ्यांचा त्यांना प्रतिसाद कमी होत आहे. त्यामुळे ते वैफल्यातून टीका करत आहेत'
मनोज जरांगे पाटलांची जी वक्तव्य येतायत याला मस्ती आणि माज नाही म्हणायंचं तर काय म्हणायचं? असा सवाल भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केलाय. तर प्रत्येक जण भाजप, फडणवीसांचा माणूस, मात्र हा शरद पवार आणि महाविकास आघाडीचा माणूस आहे. ज्या पद्धतीने याने मराठ्यांचं नुकसान केलं, मराठ्यांना खड्ड्यात घालण्याचं काम केलं असं म्हणत प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटलांना आव्हान दिलंय. ते म्हणाले, ‘हिंमत असेल तर चर्चेला यावं…देवेंद्र फडणवीसांची चूक दाखवावी. जेव्हा मी आणि प्रविण दरेकर बोललो त्यावेळी मराठा नेते बोलले असते, तर तुमची माजाची चादर टराटरा फाडली असती त्यामुळे हिंमत असेल तर महाराष्ट्रात २८८ उभे करा, आम्ही ताकदीने उभे राहू.’ पुढे ते असेही म्हणाले की, शरद पवारांचं घातलेलं कातडं याचं फाडल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही, असेही म्हणत प्रसाद लाड यांनी विरोधकांसह मनोज जरांगे पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तर प्रवीण दरकरांनीही जोरदार निशाणा साधला आहे.