Prasad Lad : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करण्यापेक्षा... प्रसाद लाड यांनी मराठा युवकांना दिला सल्ला

Prasad Lad : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करण्यापेक्षा… प्रसाद लाड यांनी मराठा युवकांना दिला सल्ला

| Updated on: Oct 22, 2023 | 4:27 PM

VIDEO | मराठ्यांना आरक्षण मिळावं ही मनोज जरांगे पाटील यांची मुख्य मागणी आहे, सरकारला जरांगेंनी दिलेल्या अल्टिमेटमला दोन दिवस उरले. सरकार कोणता निर्णय घेणार याकडे मराठ्यांचं लक्ष, अशातच मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका सरकारची असल्याचे प्रसाद लाड म्हणाले.

मुंबई, २२ ऑक्टोबर २०२३ | मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील हे शांततापूर्ण असं आंदोलन करत आहे. त्यामुळे त्यांची मुख्य मागणी ही मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, राज्य सरकारची देखील हीच मागणी आहे की, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, असे भाजपचे प्रसाद लाड म्हणाले. तर २०१८ साली देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं. परंतु उच्च न्यायालयात ते टिकंल पण सर्वोच्च न्यायालयात ते टिकलं नाही. आता एकनाथ शिंदे यांचं सरकार आहे. त्यांनी देखील यासंदर्भात एक समिती गठीत करून आरक्षण कसं मिळेल यासाठी सातत्याने प्रयत्न करताय. मात्र खोटं बोलून मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम करायचे नाहीये. मागच्या काळात मराठा समाजाचे मुख्यमंत्री झाले तरीही ते मराठा आरक्षण देऊ शकले नाही. मात्र फडणवीस यांनी प्रामाणिक प्रयत्न केला. दरम्यान, न्यायालयाला ज्या त्रुटी आढळल्या त्या पूर्ण करून पुन्हा सरकार मागे उभं आहे. मराठा समाजाला काही कमी पडू नये ही सरकारची भूमिका असल्याचे प्रसाद लाड यांनी म्हटले. आरक्षणासाठी आंदोलन करण्यापेक्षा मराठा तरुणांनी सर्व गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.

Published on: Oct 22, 2023 04:27 PM