'जे रात्री फुकायचे ते सकाळीही फुकून बोलताय, त्या फुकऱ्यांबद्दल काय बोलायचं', संजय राऊतांवर हल्लाबोल

‘जे रात्री फुकायचे ते सकाळीही फुकून बोलताय, त्या फुकऱ्यांबद्दल काय बोलायचं’, संजय राऊतांवर हल्लाबोल

| Updated on: Apr 06, 2023 | 2:47 PM

VIDEO | महाराष्ट्रात सध्या तीन पैशाचा तमाशा सुरु, भाजप नेत्याचा ठाकरे गटावर निशाणा, बघा काय केली टीका

मुंबई : ठाकरे गटाच्या सामना या मुखपत्रातून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर काडतूस गृहमंत्री फडतूस भाषेत आरोळी ठोकतात, अशी टीका केली. यावर भाजप नेते प्रसाद लाड यांनी जोरजार प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्रात सध्या तीन पैशाचा तमाशा सुरू आहे. तीन पैशांच्या तमाशा वाल्यांना जेव्हा बोलायचं तेव्हा आम्ही बोलू, अशीही अप्रत्यक्षपणे टीका केली तर पक्ष बदलणार्यावर काय बोलायचं अशी टीका संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर केल्यानंतर प्रसाद लाड यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत ते म्हणाले, आधी रात्री फुकायचे आता सकाळीही फुंकतात. या फुकऱ्यांबद्दल काय बोलायचं असे म्हणत जोरदार हल्लाबोल केला.

Published on: Apr 06, 2023 02:40 PM