'बेरोजगार ठाकरे-पवारांना काम नाही, जनतेत जायचं अन्...', मविआच्या 'जोडे मारो'वरून भाजप नेत्याचा हल्लाबोल

‘बेरोजगार ठाकरे-पवारांना काम नाही, जनतेत जायचं अन्…’, मविआच्या ‘जोडे मारो’वरून भाजप नेत्याचा हल्लाबोल

| Updated on: Sep 01, 2024 | 4:06 PM

मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारलेला शिवरायांचा पुतळा अवघ्या ८ महिन्यात कोसळल्याच्या निषेधार्थ मविआने महायुती सरकारचा निषेध व्यक्त केला. मुंबईतील हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्या नेतृत्वात मुंबईत ‘जोडे मारो’ आंदोलन कऱण्यात आलं यावर भाजप नेत्याची प्रतिक्रिया

राज्यातील जनतेत वेगळं वातावरण निर्माण करून त्यांच्यात तेढ निर्माण करायची आणि वातावरण खराब करून दंगली घडवायच्या, हे काम महाविकास आघाडीकडून केलं जात असल्याचे वक्तव्य भाजप नेते प्रसाद लाड यांनी केले आहे. तर मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला या घटनेचा महायुतीकडून निषेध व्यक्त केला जातोय. इतकंच नाहीतर पंतप्रधान मोदी, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून या घटनेबाबत माफी मागण्यात आली आहे. परंतु आम्ही त्यांचं राजकारण केलं नाही आणि करू इच्छित नाही, असेही प्रसाद लाड म्हणाले. पुढे ते असेही म्हणाले, काही बेरोजगार लोकांना काम नाही, त्यामुळे महायुतीच्या चांगल्या कामावर वितुष्ट आणण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे. शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर निषेध व्यक्त करून माफी मागितली. परंतू त्यांचं राजकारण करून जनतेत जायचं त्यांना वेठीस धरायचं हा उद्योग उद्धव ठाकरे आणि शरद पवार करताय तो बंद झाला पाहिजे असेही प्रसाद लाड म्हणाले.

Published on: Sep 01, 2024 04:06 PM