आंदोलनात मराठ्यांची गर्दी म्हणून जरांगेंची पोपटपंची, भंपकपणा उघड करणार…; भाजप नेत्याचा थेट इशारा
'मराठा समाजाने तुमच्या आंदोलनात गर्दी केली म्हणून तुम्ही पोपटपंची करताय, आम्ही तर थेट गेल्या काही वर्षांपासून रस्त्यावर उतरून काम करतोय, असंही प्रवीण दरकेर यांनी जरांगेंना सुनावलं. पुढे दरेकर असेही म्हणाले, माझ्यावर टीका करताय, खरंतर तुमचं ते अज्ञान आहे. मी काय काम केले त्याच्या लेखाजोखा घ्या,'
राज्य सरकारच्या लाडकी बहीण आणि लाडका भाऊ या योजनांवर मनोज जरांगे पाटील यांनी फुटकळ आरोप केला. सरकारच्या योजनांवर टीकाकरून माझ्यावरच फोकस असला पाहिजे, असं मनोज जरांगेंना वाटतं पण त्यांनी यातून बाहेर यायला हवं, असे म्हणत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी जरांगे पाटील यांना खोचक सल्ला दिला आहे. तर सरकारने आणलेल्या योजनांचा गोरगरिबांना आणि मराठा समाजातील बेरोजगार तरुणांना फायदा होणार आहे. मराठा समाजाने तुमच्या आंदोलनात गर्दी केली म्हणून तुम्ही पोपटपंची करताय, आम्ही तर थेट गेल्या काही वर्षांपासून रस्त्यावर उतरून काम करतोय, असंही प्रवीण दरकेर यांनी जरांगेंना सुनावलं. पुढे दरेकर असेही म्हणाले, माझ्यावर टीका करताय, खरंतर तुमचं ते अज्ञान आहे. मी काय काम केले त्याच्या लेखाजोखा घ्या, किती मुलांना मी रोजगार दिला त्याची देखील आपण इत्यंभूत माहिती घ्यावी, जरांगे पाटील हे सध्या राजकारणाबद्दल जास्त बोलू लागलेत त्यांचा भंपकपणा आम्ही उघड करणार असं म्हणत दरेकरांनी त्यांना इशाराच दिलाय.