Pravin Darekar | माझ्यावरील संकट मविआ निर्मित; मुळात मी ते संकट मानतच नाही
माझ्या वरच संकट हे महाविकास आघाडी निर्मित संकट आहे. आणि तसेही मी त्याला संकट मानत नाही. न्याय व्यवस्था सत्याच्या बाजूने उभी असते. असे म्हणत महाविकास आघाडीला प्रतिआव्हान दिलंय.
मुंबई : भाजप नेते प्रवीण दरेकरांवर (Pravin Darekar) सध्या कारवाईची टांगती तलवार आहे. मुंबई बँक (Mumbai Bank) बोगस मजूर प्रकरणात दरेकरांविरोधात गुन्हा दाखल झालाय. त्यामुळे त्यांचं आणि भाजपचं टेन्शन वाढलं आहे. या प्रकरणात सत्र न्यायालयानं विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. प्रविण दरेकर यांच्या अर्जावर आता सोमवारी सुनावणी होणार आहे. प्रविण दरेकर यांच्यावर तोपर्यंत कठोर कारवाई करु नये, असे आदेश न्यायालयानं दिले आहेत. या कारवाईला सुरूवात झाल्यापासून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) ही कारवाई सूडबुद्धीने करत आहे, असा आरोप भाजपकडून करण्यात आलाय. तसेच आज दरेकरांनी आज पुन्हा तोच आरोप केलाय. माझ्या वरच संकट हे महाविकास आघाडी निर्मित संकट आहे. आणि तसेही मी त्याला संकट मानत नाही. न्याय व्यवस्था सत्याच्या बाजूने उभी असते. असे म्हणत महाविकास आघाडीला प्रतिआव्हान दिलंय.