राज ठाकरे यांचं पवार साहेबांसारखं झालंय, भाजप नेत्यानं नेमकं काय म्हटलं?

राज ठाकरे यांचं पवार साहेबांसारखं झालंय, भाजप नेत्यानं नेमकं काय म्हटलं?

| Updated on: May 24, 2023 | 10:27 AM

VIDEO | त्र्यंबकेश्वर मंदिर वादावरुन भाजप नेत्याचा राज ठाकरे यांना टोला, काय केली टीका

सातारा : त्र्यंबकेश्वर मंदिर वादावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर टीका करत भाजपने या प्रकरणात नाक खुपसू नये, असा हल्लाबोल केला होता. राज ठाकरे यांच्या टीकेवर भाजप नेते प्रविण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरे आज काय बोलतात, उद्या काय बोलतात त्यांचंही राज ठाकरे यांचं पवार यांच्यासारखं झालंय. राज ठाकरे हे त्यांच्या भूमिकेवर ते कधीच ठाम नसतात. राज ठाकरे यांच्या बदलत्या भूमिकेमुळे त्यांच्या पक्षाला वाटचाल करण्यात अडचणी येत आहेत. आपल्या भूमिका, विचार ठाम असले की पक्षाला कोणतीही अडचण येत नाही, असा सल्लाही प्रविण दरेकर यांनी राज ठाकरे यांना दिला. दरम्यान, त्र्यंबकेश्वर मंदिरातील धूप दाखवण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला होता. त्यानंतर उरुस आयोजकांनी पुढच्या वर्षीपासून त्र्यंबकेश्वराला धूप न दाखवण्याचा निर्णय घेतला. मात्र यानंतरही तेथे शुद्धीकरण सारखे राजकारण झाले. यावरून मोठ्या प्रमाणावर राजकारण तापलं. याचमुद्द्यावरू राज ठाकरेंनी अनेकांना झापलं आहे. तर हा प्रश्न गावकरी आणि तेथील संस्थानाचा आहे. तो त्यांनीच सोडवायचा. त्यात यात बाहेरच्या लोकांनी तिथे जाऊन आंदोलन करण्याची गरज नाही. चुकीच्या गोष्टींवर प्रहार करणं गरजेचं आहे. पण जाणूनबुजून काही खोदून काढायचं याला काही अर्थ नाही असे म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला होता.

Published on: May 24, 2023 10:26 AM