गजानन कीर्तिकर यांचा मुलाला बिनविरोध निवडून आणण्याचा कट होता, प्रवीण दरेकरांचा गंभीर आरोप
'कोणी उमेदवार नसेल आणि अर्ज मागे घेण्याच्या अंतिम क्षणी गजानन कीर्तिकर आपला उमेदवारी मागे घेणार. अशा पद्धतीने आपल्या मुलाला बिनविरोध खासदार म्हणून निवडून आणायचं, असा गजानन कीर्तिकर यांचा पूर्वनियोजित कट होता,', भाजप नेते प्रवीण दरेकर यांचा गंभीर आरोप
गजानन कीर्तिकर यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई होणार असल्याची मोठी बातमी सूत्रांकडून मिळत आहे. शिवसेना नेते शिशिर शिंदे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून गजानन कीर्तिकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर गजानन कीर्तिकर यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहे. अशातच आता भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी गजानन कीर्तिकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उमेदवारी मिळवायची. अमोल कीर्तिकर समोर गजानन कीर्तिकर उमेदवार राहतील. दुसरा कोणी उमेदवार नसेल आणि अर्ज मागे घेण्याच्या अंतिम क्षणी गजानन कीर्तिकर आपला उमेदवारी मागे घेणार. अशा पद्धतीने आपल्या मुलाला बिनविरोध खासदार म्हणून निवडून आणायचं, असा गजानन कीर्तिकर यांचा पूर्वनियोजित कट होता, असा प्रवीण दरेकर यांनी केला आहे. तर एकनाथ शिंदे यांनी गजानन कीर्तिकर यांचा मान राखला. ते वरिष्ठ नेते आहेत. त्या दृष्टीने त्यांना वागणूक दिली. पण कीर्तिकरांचा उद्देशच संशयास्पद असल्याचे आता दिसून येत असल्याचेही प्रवीण दरेकर म्हणाले.