कलगीतुरा तमाशाच्या फडापर्यंत? दरेकर हे नथ नसलेली तमाशातली… अन् जरांगे म्हणजे गणपत पाटील?; नेत्यांमध्ये जुंपली
आरक्षणाच्या मुद्द्यावरून २० मिनिटं शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. माहितीनुसार, आरक्षणाच्या तिढ्यासंदर्भात लवकरच सर्वपक्षीय बैठक बोलवली जाणार आहे. तर दुसरीकडे आरक्षणाच्या वादावरून मनोज जरांगे पाटील आणि भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांच्यात चांगलेच शाब्दिक युद्ध रंगलंय
अडचणी नसली की शरद पवारांना भ्रष्टाचाराचं सरदार आणि भटकती आत्मा म्हणायचे आणि अडचण असली की शरद पवारांनाच बोलवायचं ही दुटप्पी भूमिका असल्याचे म्हणत जयंत पाटलांनी भाजपवर टीका केली आहे. आरक्षणावर विरोधक आपली भूमिका का मांडत नाही, असे म्हणून महायुतीने शरद पवार यांना सवाल केला. दरम्यान, आरक्षणाच्या मुद्द्यावरून २० मिनिटं शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. माहितीनुसार, आरक्षणाच्या तिढ्यासंदर्भात लवकरच सर्वपक्षीय बैठक बोलवली जाणार आहे. तर दुसरीकडे आरक्षणाच्या वादावरून मनोज जरांगे पाटील आणि भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांच्यात चांगलेच शाब्दिक युद्ध रंगलंय. जरांगेंच्या टीकेला उत्तर देताना दरेकरांनी एक उदाहरण देत उत्तर देणं टाळलं. तर तमाशातल्या मावशीच्या टीकेवर दरेकर म्हणाले गणपत पाटलांचं उदाहरण देऊ शकतो पण मी देणार नाही… बघा काय रंगतोय वार-पलटवार?