‘अजित पवार यांना डावललं जातंय, त्यांनी योग्य भूमिका घ्यावी’, भाजप नेत्याचा नेमका सल्ला काय?
VIDEO | 'अजित पवार यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम राष्ट्रवादीनं केलंय', भाजप नेत्यानं काय केलं भाष्य?
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या २५ व्या वर्धापन दिनी राष्ट्रवादीचे अध्क्ष शरद पवार यांनी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना कार्यकारी अध्यक्ष करण्याची घोषणा केली. यानंतर अजित पवार यांना का संधी दिली नाही. त्यांना डावललं गेल्याची चर्चा सुरू झाली. यानंतर मला महाराष्ट्रात राजकारणात रस आहे, असं विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलंय. तर यावर बोलताना भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनीही प्रतिक्रिया दिली. ‘मला वाटते अलीकडच्या काळात संदेश देण्याचा प्रयत्न झाल्याचं दिसते. राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते यांच्यात जनाधार असलेला नेता’ अशी अजित पवार यांची ओळख आहे. सुप्रिया सुळे यांना देशाचं नेतृत्व दिलं हे ठिक आहे. पण, राज्याचे नेतृत्व सुप्रिया सुळे यांना दिले. यातून संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचं वाटत असल्याचं प्रवीण दरेकर म्हणाले. उद्या असंही सांगितलं जाईल की, अजित पवार यांनी सुचवलं. त्यांनी ठराव मांडला. आम्ही चर्चा करून ठरवलं, असं भुजबळ म्हणाले. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना कार्यकारी अध्यक्ष करा, असं म्हटलं होतं, याची आठवण प्रवीण दरेकर यांनी करून दिली. अजित पवार यांनी योग्य भूमिका घेण्याची गरज आहे. अजित पवार यांच्यावर अन्याय होतो. असेही प्रवीण दरेकर म्हणाले.