Special Report | जाहिरातीमुळं युतीत मिठाचा दुसरा खडा? युतीत घमासान…अचानक काय झालं?
VIDEO | भाजप-सेना युतीत मिठाचा दुसरा खडा, भाजपलाच इशारा; बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : कल्याणमधील भाजपचे काही नेते युतीत खडे टाकताय, असा आरोप श्रीकांत शिंदे यांनी केला होता. त्यानंतर गजानन किर्तीकर यांनी भाजपलाच इशारा दिलाय. शिवसेनेच्या ४० आमदारांमुळे भाजप सत्तेत आहे असं किर्तीकर म्हणाले. तर युतीत घमासान का सुरू झालं….देशात मोदी आणि राज्यात शिंदे हे ठासून सांगणारी जाहीरात वृत्तपत्रात येण्याआधी गजानन किर्तीकर यांनी भाजपला इशारा दिला आणि शिंदेच्या आमदारांची ताकदही तितकीच महत्त्वाची आहे असे म्हणत किर्तीकरांनी त्यांचा आत्मविश्वासही वाढवला. गजानन किर्तीकर म्हणाले, शिवेसनेचे ४० आमदार एकत्र आल्यामुळेचे आज भाजप पुन्हा एकदा सत्तेत आली. त्यामुळे आपली ताकद ओळखणं गरजेचं आहे. ४० आमदार सोबत होते म्हणूनच महाविकास आघाडीची सत्ता उलथवून टाकली. मुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरे यांना पायउतार केले आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. असे म्हणत गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटातील आमदारांचा आत्मविश्वास वाढवला आहे.
तर भाजपच्या प्रविण दरेकरांनी उत्तर दिलंय ४० आमदारांनी काय होत नाही, भाजपचे तिप्पट आमदार आहेत. ‘शिवसेनेचे ४० आमदार आणि भाजपच्या आमदार एकत्र आले म्हणून सत्ता आलीये. टाळी एका हाताने वाजत नाही. ताकद आपापसात आजमावण्यापेक्षा विरोधकांनी त्या ताकदीचा धस्का घेतला पाहिजे. त्यामुळे कुठल्याही वक्तव्याने शिवसेना – भाजपमध्ये दुरावा निर्माण होणार नाही. याची दक्षता घ्यावी’, असा सल्ला दरेकर यांनी गजानन किर्तीकर यांना दिलाय.