... तर यापेक्षा दुर्दैव काय? समीर वानखडे आणि संजय राऊत यांच्या भेटीवर भाजप नेत्याचं भाष्य

… तर यापेक्षा दुर्दैव काय? समीर वानखडे आणि संजय राऊत यांच्या भेटीवर भाजप नेत्याचं भाष्य

| Updated on: Nov 12, 2023 | 5:37 PM

एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांची भेट घेतली असल्याचे समोर आले आहे. दिवाळीनिमित्त समीर वानखेडे यांनी संजय राऊत यांच्या घरी जाऊन आज भेट घेतली. या भेटीवर भाजप नेते आणि आमदार यांची प्रतिक्रिया, बघा काय म्हणाले...?

मुंबई, १२ नोव्हेंबर २०२३ | एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांची भेट घेतली असल्याचे समोर आले आहे. दिवाळीनिमित्त समीर वानखेडे यांनी संजय राऊत यांच्या घरी जाऊन आज भेट घेतली आहे. भांडुप येथे एका कार्यक्रमानिमित्ताने समीर वानखडे आणि संजय राऊत एकत्र आले होते. दरम्यान संजय राऊत यांच्या घरी जाऊन समीर वानखेडे यांनी दीपावलीच्या शुभेच्छा दिल्यात तर यावेळी तुमचा आमचा संघर्ष एकच, असे म्हणत संजय राऊत यांनी टिप्पणी केली. समीर वानखडे आणि संजय राऊत यांच्या भेटीवर विरोधकांनीही टीका-टिप्पणी केल्याचे पाहायला मिळत आहे. समीर वानखडे आणि संजय राऊत हे दोघेही राजकारणाची दिशा ठरवणार असतील तर यापेक्षा दुर्दैव काय? हे दोघेही आरोपी आहेत. भविष्यात आरोपातून कसं सुटायचं यावर दोघांनी चर्चा केली असेल, अशी प्रतिक्रिया भाजप नेते, आमदार प्रवीण दरेकर यांनी दिली.

Published on: Nov 12, 2023 05:32 PM