Pravin Darekar | आम्ही तिसरा डोळा उघडला तर मविआला बघून घेऊ - प्रवीण दरेकर

Pravin Darekar | आम्ही तिसरा डोळा उघडला तर मविआला बघून घेऊ – प्रवीण दरेकर

| Updated on: Nov 11, 2021 | 5:20 PM

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांनी भावनिक बोलून एसटी कर्मचारी यांचा प्रश्न सुटणार नाही, असं दरेकर म्हणाले आहेत.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांनी भावनिक बोलून एसटी कर्मचारी यांचा प्रश्न सुटणार नाही, असं दरेकर म्हणाले आहेत.अनेक शिवसैनिकांच्या संसाराच्या होळ्या करून शिवसेना उभी राहिली आहे, अशी टीका प्रविण दरेकर यांनी केली आहे.

भाजपला एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर कुणाची पोळी भाजण्याची गरज नाही. कोणतीही इच्छा असेल तर सर्व कांही करता येईल.महाराष्ट्रातील एसटी महामंडळ हे देशातील सर्वात मोठ महामंडळ आहे.त्यात काही लिकेजस आहेत. ते व्यवस्थित केलं तर सर्व काही व्यवस्थित करता येईल, असं दरेकर म्हणाले आहेत.