अंबादास दानवे यांचं पद धोक्यात? भाजप नेत्याचं सूतोवाच, बघा काय केलं खळबळजनक वक्तव्य
VIDEO | सत्ताधारी पक्षाचा आमदार विरोधी पक्षनेता कसा होऊ शकतो, भाजप नेत्याचा अंबादास दानवे यांचा थेट सवाल, बघा काय दिले संकेत
मुंबई : सुप्रीम कोर्टात शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा आणि एकनाथ शिंदे सरकारचाच प्रश्न प्रलंबित असताना राजकीय वर्तुळात नाट्यमय घडामोडी घडत आहे. एकनाथ शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि नाव देण्याचा निर्णय झाल्यानंतर एकनाथ शिंदे गट आक्रमक झाला आहे. पक्ष म्हणून जे जे काही हाती घेता येईल, ते ते अग्रक्रमाने करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे गटाकडून होतोय. ठाकरे यांच्या आमदारांना शिंदे गटाकडून व्हिपदेखील लागू करण्यात आला आहे. अशातच आता उद्या ठाकरे गटासाठी आणखी एक आव्हान उभं ठाकणार असल्याचे संकेत भाजप नेत्याकडून देण्यात आले. विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचं पद धोक्यात आलं आहे. भाजप नेते प्रविण दरेकर यांनी यासंबंधीचं सूतोवाच केल आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या पदावरून भाजप नेते प्रविण दरेकर यांनी आक्षेप घेतला आहे. बघा काय म्हणाले प्रविण दरेकर