कसबा पोटनिवडणुकीत भाजपच्या दारूण पराभवानंतर प्रविण दरेकर म्हणाताय...

कसबा पोटनिवडणुकीत भाजपच्या दारूण पराभवानंतर प्रविण दरेकर म्हणाताय…

| Updated on: Mar 02, 2023 | 3:20 PM

VIDEO | काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या विजयावर प्रविण दरेकर यांची प्रतिक्रिया, भाजपची पिछेहाट दरेकर यांनी थेट सांगितली कारणं, बघा व्हिडीओ

अक्षय मंकनी, पुणे : कसबा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराची धुरा भाजपमधील विधान परिषदेचे गटनेते प्रविण दरेकर यांनी सांभाळली होती. कसब्यातील भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्या विजय व्हावा, याकरता प्रविण दरेकर हे ८ दिवस पुण्यात प्रचार करत होते. मात्र कसबा मतदारसंघात भाजपचा मोठा पराभव झाला आहे. कसबा मतदारसंघात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी झाले. यावर प्रतिक्रिया देताना प्रविण दरेकर म्हणाले, कसब्याची निवडणूक ही पहिल्या दिवसापासून रवींद्र धंगेकर या उमेदवारांवर केंद्रित होती. भाजपच्या कार्यकर्त्यांनी अपार कष्ट घेतले. ही निवडणूक वनसाईड होईल, अशी परिस्थिती होती. पण, भाजपने घेतलेल्या मेहनतीमुळे ही अटीतटीची अशी निवडणूक होताना दिसत आहे. पक्षापेक्षा उमेदवार जनतेने पाहिला. उमेदवार केंद्रीत अशाप्रकारची ही निवडणूक झाली. विजयाचा कल रवींद्र धंगेकर यांच्या बाजूने दिसत असल्याने रवींद्र धंगेकर यांचा विजय आम्ही खुल्या मनाने स्वीकारत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Published on: Mar 02, 2023 03:20 PM