Pravin Darekar | सत्ताधारी राणे साहेबांसोबत विकृती पद्धतीने वागत आहेत, दरेकरांचा निशाणा
सत्ताधारी राणे साहेबांसोबत विकृती पद्धतीने वागत आहेत. राणे साहेबांना मुक्त करुन जन आशिर्वाद यात्रा पुढे नेण्याचा मानस आहे. तिथले वातावरण, कार्यकर्ते, पुढची मुव्हमेंट याबाबत तेथील नेत्यांशी चर्चा करुन काय करता येईल सर्व वातावरण नीट करण्याचा प्रयत्न करु, असे भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले.
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पुढची जन आशीर्वाद यात्रा ही राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. त्याकरीता प्रवीण दरेकर रत्नागिरीकडे रवाना झालेले आहेत. सत्ताधारी राणे साहेबांसोबत विकृती पद्धतीने वागत आहेत. राणे साहेबांना मुक्त करुन जन आशिर्वाद यात्रा पुढे नेण्याचा मानस आहे. तिथले वातावरण, कार्यकर्ते, पुढची मुव्हमेंट याबाबत तेथील नेत्यांशी चर्चा करुन काय करता येईल सर्व वातावरण नीट करण्याचा प्रयत्न करु, असे भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली लगावण्याचं वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर अटक झाली आहे. नारायण राणेंविरुद्ध नाशिक, पुणे, रायगड अशा विविध ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता. नाशिक आणि पुणे पोलिसांनी कोकणात पथकं पाठवली होती. त्यानंतर रत्नागिरी पोलिसांनी राणेंना अटक केली.