मनसे महायुतीच्या सहभागावर दरेकर म्हणाले, त्या सगळ्यांना सोबत नेण्याची आमची तयारी
महायुतीच्या विकासाच्या रथाला चौथं चाक जोडलं जाईल अशी चर्चांनाही उधाण आलंय. यावर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिलीयं. साथ देतील त्या सगळ्या पक्षांना सोबत नेण्याची आमची तयारी आहे, मनसे आमच्या सोबत आल्यास स्वागतच आहे, प्रवीण दरेकर यांनी भाष्य केले.
येत्या ९ एप्रिल रोजी गुढीपाडव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा शिवतीर्थावर मेळावा आहे. यावेळी राज ठाकरेंकडून मोठी घोषणा होणार असल्याची चर्चाही होतेय. त्यामुळे महायुतीच्या विकासाच्या रथाला चौथं चाक जोडलं जाईल अशी चर्चांनाही उधाण आलंय. यावर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिलीयं. साथ देतील त्या सगळ्या पक्षांना सोबत नेण्याची आमची तयारी आहे, मनसे आमच्या सोबत आल्यास स्वागतच आहे, असे वक्तव्य भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय. मनसे आणि भाजप यांच्या युतीच्या चर्चांवर प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘राष्ट्र प्रथम आमच्यासाठी आहे. यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पेसाठी या देशातील पक्ष आणि नेते सोबत येतील साथ देतील त्यांचं कोणतंही विचार न करता स्वागतच भाजपने केले आहे. त्यासाठी भाजप दोन पाऊलं मागे आले आणि तडजोड केलंय.’, असेही प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.