भाजपचे राजेंद्र गावित, शरद पवार गटाचे उदयसिंग पाडवी विधानसभेसाठी इच्छूक, शहाद्यातून काँग्रेस कोणाला तिकीट देणार?
नंदुरबारच्या शहाद्यातून भाजपचे राजेंद्र गावित, शरद पवार गटाचे उदयसिंग पाडवी हे काँग्रेसच्या तिकीटावर लढण्यासाठी तयार आहेत तर माजी आमदार पद्माकर वळवी यांच्या कन्या सीमा वळवी यांनी देखील निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली.
२०१९ च्या निवडणुकीवेळी भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग झालं होतं. मात्र यंदा भाजपमधून आऊट गोईंग होताना दिसतंय. नंदुरबारच्या शहादा विधानसभेतील भाजपचे ज्येष्ठ नेते राजेंद्र गावित हे काँग्रेसच्या वाटेवर आहेत. तर शरद पवार गटाचे उदयसिंग पाडवी हे काँग्रेसमधून लढण्यास इच्छुक आहेत. शहादा मतदारसंघातून राजेंद्र गावित यांनी काँग्रेसमधून निवडणूक लढवण्यासाठी मुलाखत देत उमेदवारीची मागणी केली आहे. तर शरद पवार गटाचे उदयसिंग पाडवी यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे. यासोबतच माजी आमदार पद्माकर वळवी यांच्या कन्या सीमा वळवी या देखील काँग्रेसकडून लढण्यास इच्छुक आहे. शहादा-तळोदा मतदारसंघात सध्या भाजपचे राजेश पाडवी हे विद्यमान आमदार आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राजेश पाडवी यांच्या विरोधात काँग्रेसचे पद्माकर वळवी हे मैदानात उतरले होते. मात्र यामध्ये राजेश पाडवी यांचा दणदणीत विजय झाला होता. बघा यंदाच्या निवडणुकीत शहादा विधानसभा मतदारसंघात नेमकं कसं चित्र आहे?

माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान

साताऱ्यातील त्या मजूर कुटुंबातील चिमुकल्याचा वैद्यकीय खर्च शिंदे करणार

संतापजनक... कचऱ्यात 6 ते 7 अर्भकं, राज्य महिला आयोगाकडून दखल अन्...

प्रशांत कोरटकर न्यायालयाबाहेर येताच शिवप्रेमी आक्रमक
