लोकसभा जिंकण्यासाठी रक्षा खडसेंनी कसली कंबर, कुटुंबसोबत नसलं तरी…
'ही निवडणूक रक्षा खडसेची व्यक्तिगत नाही तर ही केंद्राची निवडणूक आहे. तसेच मोदींना आपल्याला जास्तीत जास्त मतांनी विजयी करायचे आहे. कुटूंब सोबत नसलं तरी भाजप पक्षातील नेते कार्यकर्ते ,माझा पक्ष माझ्यासोबत उभा आहे त्यामुळे मला कुटूंबाची कमी नाही जाणवतं.'
भाजप नेत्या रक्षा खडसे यांना जळगाव मधून उमेदवारी जाहीर करण्यात आली. दरम्यान रक्षा खडसे यांनी म्हटले कार्यकर्त्यांनी ही माझा चांगला प्रचार केला, खुप छान प्रतिसाद दिला. गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे आणि काही नेत्यांमध्ये जे काही मतभेद झाले होते ते ही आता दूर झाले त्यामुळे सर्वजण झालेलं सर्व विसरुन कामाला लागले आहेत. कारण सर्वांच ध्येय आता एकचं आहे की परत तिसऱ्यांदा मोदींना या देशाचे पंतप्रधान होताना बघायचं आहे. ही निवडणूक रक्षा खडसेची व्यक्तिगत नाही तर ही केंद्राची निवडणूक आहे. तसेच मोदींना आपल्याला जास्तीत जास्त मतांनी विजयी करायचे आहे. कुटूंब सोबत नसलं तरी भाजप पक्षातील नेते कार्यकर्ते ,माझा पक्ष माझ्यासोबत उभा आहे त्यामुळे मला कुटूंबाची कमी नाही जाणवतं. दरम्यान रोहिणी खडसे यांनी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी जो लढेल तोचं विजयी होईल असं म्हटलं यावर विचारण्यात आलेल्या प्रश्नावर रक्षा खडसे म्हणाल्या मी गेली 10 वर्ष शेतकऱ्यांसाठी लढत आली आहे सरकारकडून देखील शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत करण्यात आली आहे .शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा प्रयत्न केला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.