Ram Satpute : राम सातपुतेंचा मोहिते पाटलांना इशारा अन् दिलं चॅलेंज; म्हणाले, 'वर्षभराच्या आत...'

Ram Satpute : राम सातपुतेंचा मोहिते पाटलांना इशारा अन् दिलं चॅलेंज; म्हणाले, ‘वर्षभराच्या आत…’

| Updated on: Dec 10, 2024 | 1:40 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे नुकतेच मरकडवाडीत येऊन गेले. त्यानंतर आज मरकडवाडीत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी भिडताना दिसणार आहेत. शरद पवार यांच्या दौऱ्यानंतर आज पहिल्यांदाच भाजपकडून आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत हे मारकडवाडीत दाखल झालेत

गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मरकडवाडी हे गाव चांगलंच चर्चेत असून मारकडवाडी गाव आता राजकारणाच्या केंद्रस्थानी आलंय. माळशिरस विधानसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तमराव जानकर हे विजयी झालेत तर भाजपच्या राम सातपुते यांचा पराभव झालाय. मात्र विजयी होऊनही उत्तमराव जानकरांनी मारकवडवाडीतल्या मतदानावर शंका उपस्थित केली आणि बॅलेट पेपरवर फेरमतदान घेण्याची मागणी आयोगाकडे केली. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे नुकतेच मरकडवाडीत येऊन गेले. त्यानंतर आज मरकडवाडीत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी भिडताना दिसणार आहेत. शरद पवार यांच्या दौऱ्यानंतर आज पहिल्यांदाच भाजपकडून आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत हे मारकडवाडीत दाखल झालेत. दरम्यान, नुकत्याच झालेल्या शरद पवारांच्या सभेला उत्तर देतांना भाजपने मोठे शक्तीप्रदर्शन केले. यावेळी भाजप आमदार राम सातपुते यांनी देखील रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्यावर निशाणा साधला. माळशिरसची निवडणूक ऐतिहासिक असल्याचे म्हणत राम सातपुते यांनी रणजीतसिंह मोहिते पाटलांना वर्षभराच्या आत जेलमध्ये टाकू असं म्हणत राम सातपूतेंनी रणजीतसिंह मोहिते पाटलांवर घणाघात केला. आधी निवडणूक आयोगाच्या विरोधात काम केले आणि आता भाजप नेत्यांचे पाय धरत आहेत. थोडी लाज शिल्लक असेल तर राजीनामा द्यावा. असं राम सातपुते यांनी म्हणत जोरदार हल्लाबोल केलाय.

Published on: Dec 10, 2024 01:38 PM