अधिवेशन घ्या म्हटल्यावर केंद्राकडे बोट दाखवणे म्हणजे असंगाशी संग, Sudhir Mungantiwar यांची टीका

| Updated on: Sep 21, 2021 | 8:00 PM

मुख्यमंत्र्यांच्या या पत्रानंतर भाजप नेत्यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केलीय. उद्धव ठाकरे यांनी भाजपशी युती तोडली, पण त्यांनी नितीची तरी साथ सोडू नये, असा टोला माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लगावलाय. ते चंद्रपुरात बोलत होते. 

चंद्रपूर : साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आठवड्यापूर्वी मुख्यमंत्र उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं होतं. त्यात विधिमंडळाचं दोन दिवसाचं अधिवेशन घेण्याचा सल्ला राज्यपालांनी दिला होता. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या या पत्राला आता मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं आहे. त्यात राष्ट्रातील महिला अत्याचारांना तोंड फोडण्यासाठई संसंदेचं चार दिवसांचं विशेष सत्र बोलवा, अशी मागणी राज्यपालांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या पत्रानंतर भाजप नेत्यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केलीय. उद्धव ठाकरे यांनी भाजपशी युती तोडली, पण त्यांनी नितीची तरी साथ सोडू नये, असा टोला माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लगावलाय. ते चंद्रपुरात बोलत होते.