सुधीर मुनगंटीवार यांचं जागा वाटपाबाबत मोठं वक्तव्य, जागा कुणी मागितली नाही म्हणून…
राज्यात भाजप 36 पेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. तर अजित पवार गटाकडून शिंदे यांच्या गटाला जेवढ्या जागा मिळतील तेवढ्याच आपल्याला मिळाव्यात, अशी भूमिका समोर आहे. याबाबत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना सवाल केला असता ते म्हणाले....
दिल्ली, ६ मार्च २०२४ : दिल्लीत महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची बैठक आज साडे सहा वाजता आयोजित करण्यात आली आहे. राज्यातील भाजपच्या नेत्यांची रावसहेब दानवे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही बैठक होणार आहे. राज्यात भाजप 36 पेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. तर अजित पवार गटाकडून शिंदे यांच्या गटाला जेवढ्या जागा मिळतील तेवढ्याच आपल्याला मिळाव्यात, अशी भूमिका समोर आहे. याबाबत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना सवाल केला असता ते म्हणाले, “जागेची वाटाघाटी ही चाणाक्ष कॅमेऱ्याच्या समोर कधीच होत नाही. त्यामुळे जागेच्या वाटाघाटीबद्दल जेव्हा आपलं मत व्यक्त केलं जातं त्या मतावर आधारित वाटाघाटी कधीही होत नसतात. विजयाच्या दृष्टीने त्या मतदारसंघाचं विश्लेषण करुन सुक्ष्म अध्ययन करुन, त्या संदर्भातलं सर्वेक्षण करुन, त्या ठिकाणी असणाऱ्या जनतेचा मनोभाव बघत निर्णय होत असतो. कारण आपल्याला विजयाकडे जायचं असतं. जागा कुणी मागितली म्हणून द्यायची नसते आणि जागा कुणी मागितली नाही म्हणून थांबायचं नसतं”, अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.