Sudhir Mungantiwar यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले,'... मला भाजप आवडत नाही'

Sudhir Mungantiwar यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले,’… मला भाजप आवडत नाही’

| Updated on: Aug 31, 2023 | 7:29 PM

VIDEO | भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलं मोठं वक्तव्य; म्हणाले, 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबतचा भाजप मला आवडत नाही', सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण

छत्रपती संभाजीनगर, ३१ ऑगस्ट २०२३ | भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आज एक मोठं वक्तव्य केले. सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबतचा भारतीय जनता पक्ष मला आवडत नाही, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. तर मला देशाची सेवा करणारा भाजप आवडतो. कोणी कोणाच्या सोबत आल्याने अडचणी येत नाहीत. तुम्ही पक्ष फोडता? असा मला प्रश्न विचारण्यात आला होता. असे रावणाच्या अत्याचाराच्याविरोधात त्यांचे सख्खे बंधू प्रभू रामासोबत आले तर प्रभू रामाला तुम्ही पभ फोडला असे म्हणून आरोपी कराल का? असे म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याबाबत केलेल्या विधानावर बोलताना ते म्हणाले, व्यक्तिगत राजकारण मला आवडतं पण कोणताही पक्ष हा त्यांच्या विचारावर आवडला पाहिजे, असे ते म्हणाले.

Published on: Aug 31, 2023 07:29 PM