सत्ता गेल्यानं ठाकरेंची चिडचिड होतेय, सुधीर मुनगंटीवार यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा
सत्ता गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या मनात खदखद, त्यामुळे भाषणातून काही असे शब्द वापरले जातात त्यातून चिडचिड व्यक्त होतेय, मुनगंटीवार यांचा निशाणा
सत्ता गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या मनात खदखद होत आहे. त्यामुळे भाषणातून काही असे शब्द वापरले जातात त्यातून त्यांची चिडचिड व्यक्त केली जात आहे. उद्धव ठाकरे यांची सत्ता गेल्यानंतर त्यांचं असं एकही भाषण नाही किंवा भाष्य नाही, की ज्यामध्ये सव्वा दोन वर्षात राज्यातील जनतेच्या सेवेसाठी कोणते निर्णय घेतले. असा एकही निर्णय त्यांना सांगता येत नाही, असे वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.
ते पुढे असेही म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्याकडे टोमणे मारणं हाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पराक्रम असल्याचे म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
Published on: Jan 24, 2023 09:19 AM
Latest Videos