Pune | कोरोना व्हायरसची यांच्याशी चर्चा, गर्दी केली तरी मी हल्ला करणार नाही, सुधीर मुनगंटीवारांची मिश्किल टीका

Pune | कोरोना व्हायरसची यांच्याशी चर्चा, गर्दी केली तरी मी हल्ला करणार नाही, सुधीर मुनगंटीवारांची मिश्किल टीका

| Updated on: Jun 19, 2021 | 8:56 PM

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांची प्रचंड मोठी गर्दी जमलेली होती. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारही सहभागी झाले

पुणे : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांची प्रचंड मोठी गर्दी जमलेली होती. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारही सहभागी झाले. या कार्यक्रमात कोरोनाची नियमावली पायदळी तुडवली गेली. या गर्दीवरुन भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मिश्किल टीका केली. “कोरोना व्हायरसची यांच्याशी चर्चा झाली असावी की जर तुम्ही गर्दी केली तरी मी तुमच्यावर हल्ला करणार नाही. तुम्ही जर मुंबईत सर्वसामान्यांसाठी अधिवेशन भरवाल तर मी त्रास देईल. अनेक मंत्री मोर्चात सहभागी झाले. त्यावर काय कारवाई झाली? यावर हेच जमावबंदीचे आदेश लावतात. लग्नात 25 जणांपेक्षा जास्त जण असलेले तर वधू-वरावर गुन्हा दाखल करतात. अशी ही अंधेर नगरी चौपट राजा, गजब सरकरकी अजब कहानी, या सरकारचे हे अजब मंत्री. एकीकडे गर्दी जमवतात दुसरीकडे ज्ञान सांगतात”, असं मुनगंटीवार म्हणाले (BJP Leader Sudhir Mungantiwar on Pune NCP program crowd) .