Suresh Dhas : अजित पवार मुंडेंना पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात सुरेश धस यांचा मोठा दावा
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचे पाहायला मिळत आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा द्यावी, यासाठी गावकऱ्यांसह राज्यभरात आंदोलनंही करण्यात आली. तर दुसरीकडे विरोधक महायुतीमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी देखील धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही भूमिका घेत ही मागणी […]
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचे पाहायला मिळत आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा द्यावी, यासाठी गावकऱ्यांसह राज्यभरात आंदोलनंही करण्यात आली. तर दुसरीकडे विरोधक महायुतीमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी देखील धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही भूमिका घेत ही मागणी लावून धरली आहे. अशातच टीव्ही ९ मराठीला सुरेश धस यांनी मुलाखत दिली. यावेळी संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना अजित पवार पाठिशी घालत असल्याचा मोठा दावाही केला. तर राजीनाम्याची मागणी केल्यावर अजित दादा राजीनामा घेतील का? असा सवाल केला असता सुरेश धस म्हणाले, ‘आम्ही मागणी केली दादा राजीनामा घेतील असं मला वाटत नाही ते त्यांनी घ्यावा का नाही तो त्यांचा प्रश्न आहे. हा प्रश्न माझ्या पक्षाचा हे नाहीये. माझी मागणी प्रामाणिक आहे की त्यांनी राजीनामा घेतला पाहिजे आणि धनंजय मुंडे यांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे की हे जे खालचं साम्राज्य त्यांचं इतकं काळ कुठं साम्राज्य होऊन बसलेला आहे की त्याच्यातून आता अंधारातील दिवा सापडायला स्वतः धनंजय मुंडेंनाच फिरावं लागणार आहे.’, असे सुरेश धस म्हणाले.