भाजप कोअर बैठकीत अजितदादा अन् शिंदेंवर नाराजी? कोणतीही मदत न केल्याचा सूर?
भाजपच्या कोअर कमिटीतील बैठकीत काही जणांनी शिंदे आणि अजित दादांबद्दल नाराजी व्यक्त केल्याचे समजतंय. आगामी निवडणुकीसाठी बैठक होती. ज्यात आगामी विधानसभा निवडणुकीची रणनिती आणि लोकसभेतील पराभवाचे चिंतन केले गेले. या कोअर कमिटीतील बैठकीत भाजपने शिंदे गट आणि अजित दादा गटातील आमदारांवर नाराजी व्यक्त केली
लोकसभेत महायुतीला फटका बसल्यानंतर आगामी निवडणुका तोंडावर असताना भाजपच्या कोअर कमिटी बैठकीत काही नेत्यांनी दादा-शिंदेंवर नाराजी व्यक्त केली. भाजपच्या कोअर कमिटीतील बैठकीत काही जणांनी शिंदे आणि अजित दादांबद्दल नाराजी व्यक्त केल्याचे समजतंय. आगामी निवडणुकीसाठी बैठक होती. ज्यात आगामी विधानसभा निवडणुकीची रणनिती आणि लोकसभेतील पराभवाचे चिंतन केले गेले. दरम्यान, लोकसभेत शिंदेंना १५ जागा देण्याची काहीही गरज नव्हती. आता आगामी विधानसभा जागावाटपात त्रास होऊ शकतो. आजित पवारांच्या आमदारांचं अनेक ठिकाणी भाजपला असहकार्य असल्याचा आरोप करून भाजपच्या कोअर कमिटी बैठकीत दादा-शिंदेंवर नाराजी दर्शवताना नेत्यांचा सूर होता, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. दिंडोरी, सांगली, पुणे, सोलापूर, बुलढाणा, सातारा या ठिकाणी अजित दादांच्या आमदारांनी महायुतीऐवजी महाविकास आघाडीचं काम केलं. यासबोतच जालना आणि पालघर या ठिकाणी शिंदे गटाने मदत न केल्याची तक्रार भाजपकडून करण्यात आली.