उमेदवारीसाठी भाजप नेत्यांची मोठी लिस्ट, तेच नेते घेऊन जरांगे पाटील लढणार? फडणवीसांना पुन्हा इशारा
मनोज जरांगे पाटील येत्या २९ ऑगस्ट रोजी भूमिका स्पष्ट करणार आहेत. पण त्याआधीच भाजपच्या नेत्यांनी उमेदवारीसाठी मनोज जरांगे पाटलांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. मिनल खतगावकर यांच्यानंतर संगिता ठोंबरे आणि राजेंद्र म्हस्के यांनीही मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे.
आतापर्यंत भाजपचे तीन बडे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आलेत. निमित्त मात्र एकच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी….गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपच्या मिनल खतगावकर यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली. आता बीडचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के आणि केजच्या माजी आमदार संगिता ठोंबरे यांनी तर जरांगे पाटील यांची भेट घेत थेट तिकीटाचीच मागणी केली आहे. यावरूनच असे दिसतेय की, भाजपचे नेते उमेदवारीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे येत आहेत. उमेदवारी देताना माझा विचार करा, शब्द फिरणार नाही, असे संगिता ठोंबरे म्हणाल्या. तर उमेदवारीसाठी भाजपच्या नेत्याची लिस्ट असून तात्काळ आरक्षणाचा मार्ग मोकळा करा, नाहीतर पाडणारच असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
Published on: Aug 18, 2024 10:50 AM
Latest Videos