'भावी मुख्यमंत्री' बॅनवरून भाजपची टोलेबाजी, 'रोहित पवार हे अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष व्हावे', कुणी दिल्या खोचक शुभेच्छा?

‘भावी मुख्यमंत्री’ बॅनवरून भाजपची टोलेबाजी, ‘रोहित पवार हे अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष व्हावे’, कुणी दिल्या खोचक शुभेच्छा?

| Updated on: Sep 24, 2023 | 5:59 PM

VIDEO | पहिल्यांदाच आमदार झालेले रोहित पवार यांचा 'भावी मुख्यमंत्री' असा उल्लेख असणाऱ्या बॅनवरून चर्चांना उधाण, पुण्यातील रोहित पवार यांच्या बॅनवरून भाजपनं नेमकी काय केली टोलेबाजी?

मुंबई, २४ सप्टेंबर २०२३ | अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यानंतर आता पवार कुटुंबीयांतून आणखी एक भावी मुख्यमंत्री पदाच्या रांगेत आल्याचे आज पाहायला मिळाले. पहिल्यांदाच आमदार झालेले रोहित पवार यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. रोहित पवार यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना त्यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करण्यात आला आहे. पुणे द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यावर लागलेले हे बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अशातच रोहित पवार यांच्या भावी मुख्यमंत्री च्या बॅनरवर भाजप नेत्यांची टोलेबाजी पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातून आतापर्यंत ४० मुख्यमंत्री झालेत असे म्हणत रोहित पवार यांच्यावर भावी मुख्यमंत्री बॅनरवर सडकून टीका केली आहे. तर नितेश राणे यांनी खोचक टोला लगावत रोहित पवार यांचे अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष म्हणून बॅनर लागावेत, असे म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत.

Published on: Sep 24, 2023 05:59 PM