ज्या आईने तुम्हाला जन्म दिला… राऊतांच्या ‘त्या’ वादग्रस्त टीकेवर नवनीत राणांची पहिली प्रतिक्रिया
वर्धा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी प्रचार सभा होणार आहे. तर भाजपच्या अमरावती लोकसभा उमेदवार नवनीत राणा यांच्याकडून लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. कार्यकर्ते आणि समर्थकांसह नवनीत राणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभास्थळी जात आहेत.
अमरावतीत नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली होती. राऊतांनी नाची, डान्सर असा उल्लेख राणांसंबंधित केला होता. यावर नवनीत राणांनी प्रतिक्रिया दिलीये. ‘अंबानगरी म्हणून अमरावतीची ओळख आहे. तिथेच येऊन संजय राऊत यांनी एका महिलेचा खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. विशेष म्हणजे माझ्या नणंदबाई त्याच मंचावर होते. त्यांनी राऊतांनी केलेल्या वक्तव्यावर खिल्ली उडवली हे मोठं दुखः आहे. ज्या मुलीला तुम्ही सासरी पाठवलं त्या मुलीला विचारा, ज्या आईने तुम्हाला जन्म दिला तिला विचारा तुम्ही काय शब्द वापरलाय?’, असा सवाल करत नवनीत राणांनी राऊतांवर पलटवार केलाय. वर्धा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी प्रचार सभा होणार आहे. तर भाजपच्या अमरावती लोकसभा उमेदवार नवनीत राणा यांच्याकडून लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. आज ते तिवसा येथे प्रचार रॅली सुरू आहे. कार्यकर्ते आणि समर्थकांसह नवनीत राणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभास्थळी जात आहेत. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं यंदा तिसरी टर्म आहे. प्रत्येकवेळी मोदींनी जनतेला संबोधित केलं आहे. यामाध्यमातून मोदी जनतेशी जोडले गेले आहेत हे दिसतं.’, असेही राणा म्हणाल्या.