ठरलं… भाजप लोकसभेसाठी ‘या’ 23 जागा लढणार, निरिक्षकांची नियुक्ती; कोणत्या जागेवर कुणाची नियुक्ती?
लोकसभा निवडणुकीसाठी भाजप कामाला लागली... तर महायुतीचं लोकसभेसाठीचं जागावाटप व्हायचंय. मात्र विद्यमान २३ खासदारांच्या जागा लढणारच.. हे भाजपने निरिक्षकांची यादी जाहीर करून स्पष्ट केलंय. बारामतीमध्ये अजित पवार यांच्यासाठी जागा सोडल्याचे संकेतही देण्यात आले.
मुंबई, २९ फेब्रुवारी २०२४ : महायुतीचं लोकसभेसाठीचं जागावाटप व्हायचंय. मात्र विद्यमान २३ खासदारांच्या जागा लढणारच.. हे भाजपने निरिक्षकांची यादी जाहीर करून स्पष्ट केलंय. तर बारामतीमध्ये अजित पवार यांच्यासाठी जागा सोडल्याचे संकेतही देण्यात आले. लोकसभा निवडणुकीसाठी भाजप कामाला लागली असून सध्याच्या २३ जागांवर भाजप लढणारचं असे स्पष्ट संकेत भाजपकडून देण्यात आले आहे. कारण भाजपने २३ जागांवर निरिक्षकांची नियुक्ती केली आहे. भाजपकडून बारामतीच्या जागेसाठी अद्याप कोणतीही नेमणूक करण्यात आलेली नाही. नाशिक, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या जागोसाठी देखील भाजपकडून निरिक्षकाची नियुक्ती नाही. तर बारामतीची जागा ही अजित पवार गटाला मिळण्याची शक्यता असून रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिकच्या जागेसाठी शिंदे गट आग्रही आहे. भाजपकडून 23 जागांवर निरिक्षक नेमण्यात आलेत त्यामध्ये मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, पुणे, नागपूर, भिवंडी, दिंडोरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, रावेर, अहमदनगर, बीड लातूर, जालना, नांदेड, वर्धा, अकोला, भंडारा-गोंदिया गडचिरोली, सोलापूर, माढा, सांगली या जागांवर राज्यात निरिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. बघा या जागांवर कुणाची केली नियुक्ती?