Nitesh Rane Video : माझ्या मुलाला वाचवा… उद्धव ठाकरेंचा नारायण राणेंना फोन होता, नितेश राणेंचा खळबळजनक गौप्यस्फोट
दिशा सालियनचं मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. या प्रकरणासंदर्भात दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टामध्ये धाव घेत सामूहिक बलात्कार करून दिशाची हत्या केल्याचा कुटुंबाकडून आरोप केला जात आहे.
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात वेगळं वळण आल्याचे पाहायला मिळत आहे. दिशा सालियनच्या कुटुंबीयांनी हायकोर्टात धाव घेत आदित्य ठाकरेंसह अनेकांवर गंभीर आरोप केले आहेत. दिशा सालियन प्रकरण हे सीबीआयकडे सोपवण्याची मागणीही दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी याचिकेद्वारे कोर्टात केली. दरम्यान, नितेश राणे आणि नारायण राणे यांच्याकडून आदित्य ठाकरेंवर याप्रकरणी गंभीर आरोप केले जात असताना विधानभवन परिसरात नितेश राणेंनी खळबळजनक गौप्यस्फोट केल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, सातत्याने होणाऱ्या आरोपांवर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना बदमान करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे म्हटले. इतकंच नाहीतर कोर्टात सगळं बोलू, असंही म्हटले. या प्रतिक्रियेवर नितेश राणे यांनी भाष्य केले आहे. ‘आता कोर्टात बघू… तुम्हाला जास्त त्रास नाही देणार.. जे बोलायचं ते कोर्टात बोला. पण कोर्टात हे ही सांगा ज्यांची मुलगी गेली दिशा सालियनचे वडील आता खोटं बोलताय.’ यावेळी नितेश राणेंनी मालवणी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलवण्यात आल्याचा प्रसंग माध्यमांसमोर सांगितला. ‘मालवणी पोलीस ठाण्यात नारायण राणेंनी ऑन रेकॉर्ड सांगितलं होतं की, उद्धव ठाकरेंचे दोन वेळा फोन आले होते. त्यावेळी आलेल्या फोनवर ठाकरे म्हणाले होते, माझ्या मुलाला वाचवा तुम्हालाही दोन मुलं आहेत, त्याला मदत करा’, असा गौप्यस्फोटही राणेंनी केला.

त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?

नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'

औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?

नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?
