Nitesh Rane Video : नितेश राणेंचा किशोरी पेडणेकरांना थेट सवाल, ‘दिशा सालियनच्या घरी 3 तास काय…’
दिशा सालियानची आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप भाजपचे मंत्री नितेश राणे आणि नारायण राणे यांनी केला होता. तर आदित्य ठाकरेंचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा आरोपही राणे कुटुंबीयांनी वेळोवेळी केला होता.
दिशा सालियनच्या घरी जाऊन तीन तास किशोरी पेडणेकर नेमकं काय करत होत्या? असा थेट सवाल नितेश राणे यांनी किशोरी पेडणेकर यांना केला आहे. पुढे ते असेही म्हणाले, दिशा सालियनच्या आई वडिलांवर किशोरी पेडणेकर यांनी किती दबाव टाकलाय? किती धमक्या दिल्यात? हे दिशा सालियनच्या वडिलांनीच सांगितलं आहे, असं नितेश राणे म्हणाले. दिशा सालियनच्या वडिलांनी स्वतः सांगितलं की, आम्हाला ब्रेनवॉश केलं जात होतं, असं सांगत असताना आम्ही किशोरी पेडणेकर यांच्यावर आरोप केले नाहीतर दिशा सालियनच्या वडिलांनी केले असल्याचे नितेश राणे म्हणाले.
प्रकरण नेमकं काय?
दिशा सालियन ही अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर होती. जून 2020 मध्ये चौदाव्या मजल्यावरून पडून दिशाचा मृत्यू झाला. मात्र काही भाजप नेत्यांसह राणे पितापुत्रांनी दिशावर बलात्कारानंतर हत्या झाल्याचा आरोप केला. यावरून आदित्य ठाकरेंवर सुद्धा आरोप झाले. पहिला तपास 8 जून 2020 ला मुंबई पोलिसांनी सुरू केला. तपासात मृत्यूचे कारण आत्महत्या सांगितलं गेलं. 2021 मध्ये हत्या व गुन्हेगारीचा कोणताही पुरावा नसल्याचे सांगत तपास बंद झाला.