'पश्चिमेला तोंड कोण करतं? माहित आहे ना, की...', सत्तारांसंदर्भात केलेलं रावसाहेब दानवेंचं वक्तव्य वादात

‘पश्चिमेला तोंड कोण करतं? माहित आहे ना, की…’, सत्तारांसंदर्भात केलेलं रावसाहेब दानवेंचं वक्तव्य वादात

| Updated on: Jun 24, 2024 | 12:31 PM

पश्चिमेला तोंड कोण करतं? हे माहित आहे की समजून सांगू... असं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं होतं. हेच वक्तव्य आता वादात सापडलं आहे. पुढे रावसाहेब दानवे असेही म्हणाले की, नैसर्गिकदृष्ट्या मी नेहमीप्रमाणे पूर्वेला माझं तोंड करून देवदर्शनासाठी उभा राहतो पण....

अब्दुल सत्तार नेमकं कोणत्या दिशेला तोंड करून उभं राहतात त्यावर अब्दुल सत्तार यांचा विधानसभा निवडणुकीला प्रचार करायचा का? की त्यांचा पराभव करायचा हे ठरवणार असल्याचे वक्तव्य केंद्रीय माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले आहे. दरम्यान, पश्चिमेला तोंड कोण करतं? हे माहित आहे की समजून सांगू… असं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं होतं. हेच वक्तव्य आता वादात सापडलं आहे. पुढे रावसाहेब दानवे असेही म्हणाले की, नैसर्गिकदृष्ट्या मी नेहमीप्रमाणे पूर्वेला माझं तोंड करून देवदर्शनासाठी उभा राहतो आणि देवदर्शन करतो. पण सत्तारांचं तोंड नेहमी पश्चिमेला असेल तर मी त्यांचा प्रचार कसा करू? असा सवालही त्यांनी केला आहे. ते जर पूर्वेला आमच्या बाजूला तोंड करून उभे राहिले, मला आदेश आला तर मी त्यांचा प्रचार करेन ते जर पश्चिमेला तोंड करून उभा राहिले तर मी त्यांच्या विरोधात प्रचार करेल मात्र ते कोणती भूमिका घेतात यावर मी ठरवणार असल्याचेही रावसाहेब दानवे म्हणले.

Published on: Jun 24, 2024 12:31 PM