‘नाहीतर तोंड फोडणार, युती धर्म पाळतो याचा अर्थ असा नाही…’, रामदास कदमांच्या टीकेवर रविंद्र चव्हाणांचा इशारा
भाजपचे नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण हे कुचकामी आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केली आहे. रामदास कदम यांच्या जिव्हारी टीकेवर रविंद्र चव्हाण यांचा पलटवार, बघा काय दिलं प्रत्युत्तर?
रविंद्र चव्हाण हे कुचकामी आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी रामदास कदम यांनी केली आहे. प्रभू रामचंद्रांचा वनवास 14 वर्षांनी संपला, मात्र मुंबई- गोवा या रस्त्याचा वनवास काही संपत नाही. या मार्गाची अवस्था खूप वाईट आहे. नुसते पाहणी दौरे कशासाठी करायचे, असा सवाल करत रामदास कदमांनी टीका करत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना घरचा आहेर दिला. या वक्तव्यानंतर आता राज्यातील वातावरण चांगलंच पेटलं आहे. रामदास कदमांच्या वक्तव्यानंतर आता रवींद्र चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘बोलायला ना मलासुद्धा येतं. कधीतरी रस्त्यात समोरासमोर या.. अशा भाषेत मला बोलता येतं ना, कोणी वाचवायला देखील राहणार नाही. रवि चव्हाण आहे मी, थेट उत्तर देऊ शकतो, पण युतीधर्म पाळतोय त्याचा अर्थ असा नाही की कोणीही काहीही बोलेल आणि आम्ही ऐकून घेऊ. असं होणार नाही. एक लक्षात ठेवा, तोंड सांभाळून बोलायचं नाहीतर तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही’, असे प्रत्युत्तर देत रविंद्र चव्हाण यांनी रामदास कदमांना थेट इशारा दिला आहे.