Special Report | मुंबई महापालिकेसाठी भाजपचं 'मिशन 150'

Special Report | मुंबई महापालिकेसाठी भाजपचं ‘मिशन 150’

| Updated on: Sep 05, 2022 | 11:43 PM

धोका देणाऱ्यांना भाजपचा कार्यकर्ता शिक्षा देणार असा इशारांनी शाहांनी दिला.राजकारणात काहीही सहन करा, पण धोका सहन करु नका धोका सहन करण्याची सवय लागली की राजकारणात आपली जागा मजबूत करु शकत नाही. भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं पूर्ण ताकद लावून काम केलं पाहिजे. उद्धव ठाकरे खयाली पुलाव पकवत होते.  उद्धव ठाकरेंनी केवळ 2 जागांसाठी 2014मध्ये आपल्यासोबतची युती तोडली. उद्धव ठाकरेंच्या अहंकारामुळे शिवसेना फुटली, आणि आता छोटा पक्ष झाला आमचे बाथरुम देखील सार्वजनिक आहेत,आम्ही बंद खोलीत शब्द देत नाही.

मुंबई : भाजपचे थिंक टँक, निवडणुकीचे चाणक्य अशी ओळख असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी, भाजपचं मिशन मुंबई फिक्स केलंय. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी, भाजप आणि शिंदे गटाचं मिशन 150 असल्याचं शिक्कामोर्तब झालं. म्हणजेच 227 जागांसाठी 150 जागा जिंकण्याचं टार्गेट अमित शाहांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निश्चित केलंय.

अमित शाहांनी एकाच दौऱ्यात 2 कामं केलीत. शाहांना भाजपचे आमदार, नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठकही घ्यायची होती आणि लालबागच्या राजाचं दर्शनही घ्यायचं होतं. देवदर्शनाआधी अमित शाहांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक झाली. या तिन्ही नेत्यांमध्ये जवळपास पाऊण तास चर्चा झाली त्यानंतर अमित शाहांनी लालबागच्या राजाचं आधी दर्शन घेतलं. यावेळी अमित शाहांची पत्नी, सून आणि नात होती.  तसंच मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस त्यांच्यासोबत होते. यानंतर वांद्र्यातील आशिष शेलारांच्या मंडळातील बाप्पाचं दर्शन अमित शाहांनी घेतलं.

इथून पुढे अमित शाह उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या सागर बंगल्यावर आले. सागर बंगल्यावरही फडणवीसांच्या बाप्पाचं शाहांनी दर्शन घेतलं.
यानंतर मेघदूत बंगल्यावर अमित शाहांसोबत भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आणि इथंच मिशन 150 ची घोषणा झाली
पदाधिकाऱ्यांना संबोधित केल्यानंतर अमित शाह मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आले आणि शिंदेंच्या बाप्पाचं दर्शन घेतलं.

मेघदूत बंगल्यावर जी बैठक झाली, तिथंच भाजपच्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची रणनीती ठरलीय. फडणवीसांनी तर अभी नहीं तो कभी नहीं, म्हणत पुढचा महापौर भाजपचाच अशी दावा केलाय. अमित शाहांनी तर शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केलाय.

धोका देणाऱ्यांना भाजपचा कार्यकर्ता शिक्षा देणार असा इशारांनी शाहांनी दिला.राजकारणात काहीही सहन करा, पण धोका सहन करु नका
धोका सहन करण्याची सवय लागली की राजकारणात आपली जागा मजबूत करु शकत नाही. भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं पूर्ण ताकद लावून काम केलं पाहिजे. उद्धव ठाकरे खयाली पुलाव पकवत होते.  उद्धव ठाकरेंनी केवळ 2 जागांसाठी 2014मध्ये आपल्यासोबतची युती तोडली. उद्धव ठाकरेंच्या अहंकारामुळे शिवसेना फुटली, आणि आता छोटा पक्ष झाला आमचे बाथरुम देखील सार्वजनिक आहेत,आम्ही बंद खोलीत शब्द देत नाही.

मुंबईत आतापर्यंत एकदाही भाजपचा महापौर झालेला नाही. मात्र आता शिवसेनेत 2 गट झाल्यानंतर, भाजपचा आत्मविश्वास वाढलाय.

अमित शाहांनी मुंबईत येत, कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्याचं काम केलं…पण अमित शाहांच्या मिशनवरुन शिवसेनेनं सामनातून हल्लाबोल केलाय.

शिवसेना फोडून त्यांनाच आपआपसात झुंजवून संपवायचे. यात आजच्या बेईमानांना क्षणिक लाभ झाला. आता काय तर म्हणे ‘मुंबई मिशन’ सुरु झाले आहे. हे मुंबई मिशन म्हणजे दिल्लीच्या बादशाहीचे ‘कमिशन मुंबई’ आहे. मुंबईतील मराठी माणसांत फूड पाडायची. त्यासाठी सत्ता आणि पैशांचा वारेमाप उपयोग करायचा. हा त्यांचा कावा. आमचे शिवतीर्थ आणि त्यांचे शिवतीर्थ वेगळे आहे. आम्ही शिवतीर्थी दसरा मेळावा घेऊन विचारांचे सोने लुटू नये आणि 56 वर्षांपूर्वी शिवसेना प्रमुखांनी सुरु केलेली दसरा मेळाव्याची महान परंपरा खंडित व्हावी यासाठी त्यांचे मिशन सुरु आहे. काय तर म्हणे, शिवतीर्थावर दसरा मेळावा कोणी घ्यायचा, याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे घेतील असे कमळाबाई मानभावीपणे सांगते. अरे सडक्या मेंदूच्या राज्यकर्त्यांनो, तुम्ही गोधडी भिजवत होता तेव्हापासून शिवसेना शिवतीर्थावर दसरा मेळाव्यांचे सीमोल्लंघन करीत आली आहे.

Published on: Sep 05, 2022 11:43 PM