मराठा समाजाला फसवणारा सर्वांत बेईमान नेता शरद पवार; कोणाची जहरी टीका?

मराठा समाजाला फसवणारा सर्वांत बेईमान नेता शरद पवार; कोणाची जहरी टीका?

| Updated on: Jul 17, 2024 | 3:04 PM

शरद पवार जिवंत आहेत ना..? काय हाल आहेत..! एका हाताने करायचे आणि एका हाताने फेडायचे. त्याला लेबल लागले परंतु आजच्या या कलियुगातील शकुनी मामाला ते लेबल लागले नाही आणि ते काम आपण सर्वांना करायचे आहे, असं भाजप आमदार बबनराव लोणीकर म्हणाले.

मराठा समाजाला फसवणारा सर्वात मोठा बेईमान नेता कोण असेल तर शरद पवार आहे. त्याच्याबद्दल कोणीच काही बोलत नाही. शरद पवार यांच्या मुकाबल्यात शकुनी मामा फेल आहे, असं वक्तव्य भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी केलं असून जिव्हारी लागणारी टीका केली आहे. शरद पवार जिवंत आहेत ना..? काय हाल आहेत..! एका हाताने करायचे आणि एका हाताने फेडायचे. त्याला लेबल लागले परंतु आजच्या या कलियुगातील शकुनी मामाला ते लेबल लागले नाही आणि ते काम आपण सर्वांना करायचे आहे, असं लोणीकर म्हणाले. आपल्या सरकारने मराठा आरक्षण दिलं त्याची अंमलबजावणी सुरू झाली, मराठा आरक्षण फायदा मुलांना शिक्षणात होऊ लागला. काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या पांढऱ्या पायाच्या सरकारमुळे आरक्षण गेले, असा हल्लाबोलही बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे.

Published on: Jul 17, 2024 03:04 PM