‘माझे बॅनर काढले … अभिनंदन ….’ संतप्त भाजप आमदारांची गांधीगिरी; कार्यकर्त्यांनी शुभेच्छा बॅनर लावले, मात्र…
कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे वाढदिवसाचे शुभेच्छा बॅनर काढल्याने संताप व्यक्त केला जात आहे. तर शिंदेंच्या शिवसेनावर थेट आमदार गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आमदार गायकवाड यांना शुभेच्छा देणारे बॅनर त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठीकठिकाणी लावले होते. केडीएमसीच्या वतीने वाढदिवस होताच हे बॅनर काढले आहेत.
डोंबिवली – कल्याण : गेल्या काही दिवसापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे याच्या कल्याण मतदार संघात घडामोडी होत आहेत. येथे आता पुन्हा कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे वाढदिवसाचे शुभेच्छा बॅनर काढल्याने संताप व्यक्त केला जात आहे. तर शिंदेंच्या शिवसेनावर थेट आमदार गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आमदार गायकवाड यांना शुभेच्छा देणारे बॅनर त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठीकठिकाणी लावले होते. केडीएमसीच्या वतीने वाढदिवस होताच हे बॅनर काढले आहेत. बॅनरवर कारवाई होताच आमदार पालिका अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले. थेट प्रभागात जात आमदारांनी पालिका अधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देत त्यांचा सत्कार केला. तसेच यावेळी माझे बॅनर काढले… अभिनंदन…. पण कायदा फक्त आमदार गणपत गायकवाड यांच्यासाठीच का ?… इतर बॅनरवर कारवाई करा अशी मागणी आमदार गायकवाड यांची केली. तर थेट शिंदे गटावर नाराजी व्यक्त करताना, राजकीय हेतुतून तक्रारी केल्या जातात. अदृश्य शक्ती यांच्या मागे आहेत असं नाव न घेता त्यांनी टोला लगावला आहे.