तर माझी तक्रार करू नका, नितेश राणे यांचा सरपंचांना काय भरला सज्जड दम?
सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. या जागेवर शिवसेनेकडून दावा केला जात असल्यामुळे अद्याप उमेदवारी जाहीर केली गेली नाही. परंतु नारायण राणे यांनी प्रचार सुरु केला आहे. यावेळी नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी सरपंचांना सज्जड दमच भरला आहे.
सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नसली तरी नारायण राणे यांनी प्रचार सुरु केला आहे. आता या प्रचार दरम्यान नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी सरपंचांना सज्जड दमच भरला आहे. कार्यकर्ता संवाद मेळाव्यात बोलताना आमदार नितेश राणे यांनी सरपंचांना म्हणाले, सरपंचांसहित कार्यकर्त्यांनी आपल्या निवडणुकांच्या वेळी जी यंत्रणा राबविली तीच यंत्रणा आपण लावा, असे नितेश राणेंनी म्हणाले. तर येत्या ४ जूनला सागळ्या सरपंच यांचा हिशोब घेणार आहे. मला हवा तसं लीड मिळालं नाही तर आणि मागणी असलेला निधी मिळाला नाही तर मात्र माझी तक्रार करू नका, असा नितेश राणे यांनी दम भरला. केंद्रीय मंत्री तथा लोकसभेचे संभाव्य उमेदवार नारायण राणे यांच्या समोराच नितेश राणेंनी कार्यकर्त्यांना दम दिला. कणकवली येथे कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात बोलताना नितेश राणेंनी हे वक्तव्य केल्याचे पाहायला मिळाले.