BJP आमदार Ganesh Naik प्रकरणात ठाणे कोर्ट 30 एप्रिलला निर्णय देणार

| Updated on: Apr 28, 2022 | 7:55 PM

गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणाने राज्याच्या राजकारणात खळबळ माजवली आहे. गणेश गेल्या अनेक दिवसांपासून याच प्रकरणात नॉट रिचेबल आहेत. या महिलेकडून गणेश नाईक यांना जामीन देण्यात येऊ नये अशी विनंती करण्यात आली आहे.

ठाणे : भाजप आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांना ठाणे कोर्ट तारीख पे तारीख देताना दिसत आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून नाईकांवर झालेल्या आरोपांवर युक्तीवाद सुरू आहे. नेरूळ पोलीस नाईकांची पोलीस (Navi Mumbai Police) कस्टडी मागत आहेत तर नाईकांचे वकील आरोप फेटाळून लावत आहे. मात्र गणेश नाईक यांच्या जामीनावर आजही निर्णय झाला नाही. ठाणे न्यायालयाने गणेश नाईक प्रकरणी 30 एप्रिल 2022 रोजी निर्णय देणार असल्याचे सांगितले आहे. हा निर्णय दुपारी 3 वाजता होणार आहे, असेही स्प्ष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आज पुन्हा एकदा ठाणे कोर्टाने वेळेचे कारण देत तारीख पुढे ढकलली आहे. दीपा चव्हाण (Deepa Chauhan) या महिलेने गणेश नाईक यांनी आपल्यावर अत्याचार केल्याचे आरोप केले आहेत. या प्रकरणात महिला आयोगानेही लक्ष घेतले आहे. तर गणेश नाईक यांचा राजकीय फायदा उचलण्यासाठी हे आरोप होत असल्याचा आरोप त्यांच्या वकिलांनी केला आहे.

सोमय्यांना दिलासा ! अटकेपासून संरक्षण…
Raj Thackeray : राज ठाकरेंच्या औरंगाबादेतल्या सभेला अयोध्येतून येणार कार्यकर्ते; सभेची तयारी जोरात